गणेश महासंघाच्या कार्यालयाचे थाटात उदघाटन चांगला पाऊस पडू दे : आ. विलास भुमरेंचे गणरायाला साकडे

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी राजावर संकट आल्याने पैठण विधानसभा मतदार संघाचे आमदार विलास भुमरे यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखावू दे अशी श्री गणरायाला प्रार्थना करत साकडे रविवारी (दि. १३) घातले.
निराला बाजार येथील जिल्हा श्री गणेश महासंघाच्या कार्यालयाचे भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, महापौर समीर राजूरकर, मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरीये,
पोलिस आयुक्त प्रविण पवार, मनपा आयुक्त अमोल येडगे, मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे, खा. डॉ. कल्याण काळे, माजी खा. इम्तियाज जलील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी तावडे यांची उपस्थिती होती. उपस्थितांचे स्वागत हरिभाऊ हिवाळे यांनी केले. कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब थोरात, राजू बागडे, कृष्णा बनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, संतोष जेजुरकर, मिल्लू चावरिया, किशोर तुळशीबागवाले, सुरेश टाक, विजय सुबूकुडे, भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत, पप्पू ठुबे, सुनील कोटकर, नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल, मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जोशी
डीजेबाबत पोलिस आयुक्तांचा इशारा
डीजे आणि मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर कोणीही नियमांची पळवाट शोधू नये, असा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला. दोन बेस, दोन टॉपच्या नावाखाली डीजे आणण्याचा प्रयत्न प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील. डीजे ऑपरेटरची यादी पोलिसांकडे आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यांची उपस्थिती होती. तर कार्याध्यक्ष अनिकेत निल्लावार, विशाल दाभाडे, संदिप शेळके, हरीश शिंदे, दिनेश राजेभोसले, निनाद खोचे, प्रमोद ठेंगडे, नंदू लबडे, आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन सचिन अंभोरे यांनी केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions